जाणीव संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री विजय गोरेगावकर , सचिव श्री रुपेश यादव , खजिनदार श्री बोपटे , जाणीव संस्थेचे सर्व ११ विश्वस्त , त्यांचे परिवारातील सदस्य असे एकूण ३६ सदस्य या समारंभासाठी शनिवारी दुपारी ३ वाजता तारा येथे आपल्या खाजगी वाहनाने पोहचले. सायंकाळी ५ वाजता सर्व उपस्थित सदस्यांची आपापसात ओळख परिचय झाल्यावर सर्वांना सेंटर वरील कॅन्टीन मध्ये चहा नाष्टा देण्यात आला.
शनिवारी सायंकाळी ६ वाजता जाणीव संस्थेच्या वर्धापन दिन सोहळा जाणिवेचे अध्यक्ष श्री विजय गोरेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झाला. जाणिवेचे सचिव श्री रुपेश यादव यांनी सभेला सुरुवात करताना गेल्या वर्षी विविध अप्रिय घटनांमध्ये मृत्युमुखी झालेल्या , शहीद झालेल्या देशातील विविध क्षेत्रातील मृतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर राष्ट्रगीताने सभेला सुरुवात झाली.
जाणीव संस्थेच्या गेल्या वर्षीच्या शांतीवन पनवेल येथे झालेल्या वार्षिक सभेचा इतिवृत्तांत श्री रुपेश यादव यांनी वाचून त्या इतिवृत्ताला मंजुरी देण्यात आली. गेल्या वर्षी संस्थेच्या सर्व पदाधिकारी यांच्या संयुक्तिक प्रयत्नातून एकूण १७ सामाजिक उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आलेत. त्या सर्व उपक्रमांसाठी संस्थेचे एकूण ६५ हजार रुपये खर्च झालेत.गेल्या वर्षभरात संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या एकूण चार सभा घेण्यात आल्यात. संस्थेचा गेल्या वर्षाच्या कामाचा लेखाजोखा मांडणारा अहवाल यावेळी मंजूर करून सर्व सभासदांना देण्यात आला.त्यानंतर संस्थेचा गेल्या वर्षाचा लेखा परीक्षण अहवालाचे वाचन संस्थेचे खजिनदार श्री. बोपटे यांनी वाचून त्या अहवालाला मंजुरी देण्यात आली. संस्थेचे गेल्या वर्षी लेखा परीक्षांचे कामकाज पाहणारे लेखा परीक्षक यांनाच आर्थिक वर्ष २५_२६ चे लेखा परीक्षांचे कामकाज पाहण्यास मंजुरी देण्यात आली. संस्थेच्या आर्थिक वर्ष २५_२६ च्या अंदाजपत्रकात विविध उपक्रमांसाठी एकूण ७० हजार रुपये खर्चासाठी मंजुरी देताना संस्थेचे आठ उद्दिष्टे आहेत म्हणून आर्थिक वर्ष २५_२६ मध्ये प्रत्येक उद्दिष्टांना प्रत्येकी १० हजार प्रमाणे एकूण ८० हजार रुपये अंदाज पत्रकता घेण्यात यावेत अशी सूचना करण्यात आली व त्यास मंजुरी देण्यात आली.
जाणीव संस्थेच्या मुदत ठेवीची मुदत वाढवण्यास मंजुरी देण्यात आली.
आयत्या वेळच्या विषयात संस्थेच्या रितीरिवाजाप्रमाणे सामाजिक किंवा शैक्षणिक क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या व्यक्ती म्हणून योगिनी वैदू यांना शिक्षण क्षेत्रातील भरीव कामगिरी बद्दल सन्मानचिन्ह बहाल करून गौरवण्यात आले तर संस्थेचा दोन आजीव सदस्यांना पदोन्नती मिळाल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. यात श्री संजय पाटील यांना सुधागड विद्यासंकुल कळंबोली येथे उपप्राचार्य पदावर पदोन्नती मिळाल्याबद्दल तर सौ. रंगारी मॅडम यांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात एक्झिक्युटिव्ह इंजिनियर पदावर बढती मिळाल्याबद्दल सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा