दि. २९ सप्टेंबर २०२४ रोजी रविवारी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघाच्या वत्तीने एक दिवसीय राज्यस्तरीय जिल्हा प्रतिनिधी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन पुणे येथील आबासाहेब गरवारे महाविद्यालयात करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून मराठी साहित्य विद्यापीठ, रिद्धपुर (अमरावती) चे पहिले कुलगुरू डॉ. अविनाश अवलगावकर होते, तर प्रमुख पाहुणे सुधीर भोसले सहसचिव महाराष्ट्र एजुकेशन सोसायटी पुणे, महासंघाचे अध्यक्ष प्रा.सुनील डिसले,सचिव प्रा.बाळासाहेब माने, कार्याध्यक्षा डॉ.मनीषा रिठे, उपाध्यक्ष डॉ.ज्ञानेश हटवार, उपाध्यक्ष डॉ. प्रतिभा विश्वास , कोशाध्यक्ष प्रा.संजय लेनगुरे,कोशाध्यक्ष प्रा.दिलीप जाधव, सल्लागार - प्रा.संजय पाटील , जिल्हा प्रतिनिधी प्रा. सौ. रेखा कटके (रायगड) , प्रा.दिपा ठाणेकर(मुंबई) याशिवाय महाराष्ट्रातील सर्व जिल्हा प्रतिनिधींची उपस्थिती होती.
उद्घाटकीय मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. अवलगावकर यांनी मराठी भाषेच्या संबंधित मराठी संस्कृती रुजवण्याचे काम मराठी विषय शिक्षक जोमाने करीत आहेत याचा अभिमान असल्याचे मत व्यक्त केले.
यावेळी सचिव बाळासाहेब माने यांनी आपल्या प्रस्ताविकेतून मराठी विषय शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी सर्व मराठी विषय शिक्षकांनी एकत्र यावे असे प्रतिपादन केले. सल्लागार प्रा. संजय पाटील यांनी मराठी भाषेच्या संवर्धनासाठी सर्व मराठी विषय शिक्षकांनी स्वतःच्या कॉलेजमध्ये विविध उपक्रम हाती घ्यावेत , विद्यार्थी आणि पालकांमध्ये मराठी भाषेची गोडी वाढावी म्हणून स्थानिक लेखक कवींना विशेष कार्यक्रमांच्या निमित्ताने बोलवावे. सर्व विभागीय शिक्षण मंडळात मराठी विषयाच्या मुख्य नियमकांनी विद्यार्थ्यांना मराठी विषयात जास्त गुण कसे देता येतील त्यासाठी सर्व नियामक आणि परीक्षकांना मार्गदर्शन करावे. मराठी विषयाच्या अभ्यास मंडळ सदस्यांनी मराठीचा अभ्यासक्रम घटक ठरवताना (गद्य , पद्य , उपयोजित मराठी , व्याकरण , लेखन ) विद्यार्थ्यांच्या वयाचा आणि अभिरुचीचा विचार करून घटक ठरवावेत. प्रश्न पत्रिका सेट करणाऱ्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सहज सोडवता येईल अशी प्रश्नपत्रिका काढावी . (काठिण्य पातळी) असे मत आपल्या मार्गदर्शन पर भाषणात प्राध्यापक संजय पाटील यांनी व्यक्त केले.
प्रा. रेखा कटके यांनी आपल्या मनोगतातून मराठी भाषेचे संर्वधन व विकास करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावेत व राजधानी मुंबई मधे मराठी भाषा भवन उभारण्याचे काम लवकरात लवकर करावे असे सांगितले.
यावेळी संघटनेच्या वतीने अध्यक्ष सुनील डिसले यांनी नवनियुक्त पदाधाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देवून सत्कार केला.
कार्यक्रमाचे सूत्र संचलान डॉ. पांडुरंग कंद यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. बापू खाडे(वाघेरे कॉलेज सासवड)यांनी केले.गरवारे कॉलेजच्या प्राध्यापक मंडळीनी हा कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडला.
------------ ------------ ------------- ----------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा