याबाबत सविस्तर वृत्त असे की जाणीव सामाजिक सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री विजय गोरेगावकर आणि GIA कंपनीच्या समन्वयक ज्योत्स्ना ननावरे यांनी आपल्या कल्पक बुद्धिमत्तेचा वापर करून दोन्ही संस्थांच्या पदाधिकाऱ्यांशी विचारविनिमय करून जागतिक महिला दिन वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचे नियोजन केले. त्या नियोजनानुसार शनिवार दिनांक ८ मार्च २०२५ रोजी मोरबे तालुका पनवेल येथील अतिशय दुर्गम भागातील वीट भट्टी कामगारांच्या बालकांसाठी विविध खेळांच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्य वाटप व जीवनावश्यक किराणा साहित्य प्रदान समारंभ निव्वळ अनौपचारिक पद्धतीने साजरा करण्यात आला.
या समारंभासाठी GIA कंपनी बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स चे किमान ५० सदस्य व जाणीव सामाजिक सेवा संस्थेचे २२ सदस्यांसह वीट भट्टी कामगारांची ८५ मुले , त्यांचे शिक्षक , पालक असे जवळपास १७५ लोकांना एका वटवृक्षाखाली एकत्र जमवून हा समारंभ संपन्न झाला.
त्यानंतर जाणीव सामाजिक सेवा संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी चिपले तालुका पनवेल येथील एका स्थानिक विद्यालयाला भेट दिली . तेथील शिक्षक आणि विद्यार्थ्यांसोबत महिला दिन साजरा करण्यात आला.
--- --
वार्तांकन : जाणीव सदस्य - प्रा. संजय पाटील -----
समारंभाची क्षणचित्रे खाली जोडली आहेत.
अत्यंत छान उपक्रम
उत्तर द्याहटवाअतिशय सुरेख वार्तांकन
उत्तर द्याहटवा