गुरुवार, १६ ऑक्टोबर, २०२५

*रायगड जिल्हा परिषद केंद्र शाळा वडघर येथे जागतिक हात धुवा दिन आणि वाचन प्रेरणा दिन कार्यक्रम संपन्न*

*रायगड जिल्हा परिषद केंद्र शाळा वडघर येथे जागतिक हात धुवा दिन आणि वाचन प्रेरणा दिन कार्यक्रम संपन्न*

        आजचा दिनांक १५ ऑक्टोबर हा जागतिक हात धुवा दिन आणि वाचन प्रेरणा दिन  हा कार्यक्रम जाणीव सामाजिक सेवा संस्था आणि रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराईज यांच्या संयुक्त सहकार्याने जिल्हा परिषद केंद्र शाळा वडघर येथे १५ ऑक्टोबर रोजी संपन्न झाला.
      वडघर केंद्र शाळेतील एकशे पन्नास विद्यार्थी विद्यार्थिनी , केंद्र प्रमुख, मुख्याध्यापिका, शिक्षक वर्ग, जाणीवचे सदस्य आणि रोटरीचे सदस्य यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
        सर्वप्रथम शाळेच्या वतीने जाणीव आणि रोटरीच्या उपस्थित सर्वांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. जाणीवचे निमंत्रित विश्वस्त बाळकृष्ण आंबेकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केल्यानंतर विद्यार्थ्यांना वाचन प्रेरणा दिनाबाबत आणि त्यानिमित्ताने आयोजित केलेल्या आजच्या कार्यक्रमाची माहिती जाणीव चे अध्यक्ष विजय गोरेगावकर यांनी सांगितली. आजच्या वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने विविध विषयांवरील ३५ पुस्तके शाळेला भेट देण्यात आली. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने अग्निपंख या दिवंगत भूतपूर्व राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम सरांच्या अग्निपंख या पुस्तकातील काही परिच्छेदांचे शाळेतील विद्यार्थ्यांनी वाचन केले.
      जागतिक हात धुवा दिनाच्या निमित्ताने रो.डॉ विजयकुमार कुलकर्णी यांनी शास्त्रोक्त पद्धतीने हात स्वच्छ कसे आणि का धुवावेत याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली आणि प्रात्यक्षिक दाखविले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी उत्साहाने स्वतः हात धुण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. विद्यार्थ्यांना शाळेत हात धुण्यासाठी शाळेला हॅण्ड वॉश लिक्वीड देण्यात आले. 
      त्यानंतर दंत/मौखिक आरोग्याविषयी डॉ ऋतुपर्ण ससाणे यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. 
       आजच्या कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत शाळेच्या प्राचार्या म्हात्रे मॅडम तसेच केंद्र प्रमुख ठाकूर सर यांनी दोन्ही संस्थांना धन्यवाद दिले. 
         शेवटी जाणीवचे सचिव आणि या दोन्ही उपक्रमाचे प्रकल्प संचालक रुपेश यादव यांनी आभार व्यक्त करून कार्यक्रम संपन्न झाला. 
         आजच्या कार्यक्रमास जाणीव आणि रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराइज चे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---- वार्तांकन : श्री. विजय गोरेगावकर ---

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा