रविवार, ७ जून, २०२६

पर्यावरण दिनानिमित्त : सेवाभावी संस्थांचे संयुक्त श्रमदान !

पर्यावरण दिनानिमित्त सामाजिक संस्थांचे एकत्रित श्रमदान
 
दिनांक ५ जून २०२६ या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कुष्ठरोग निवारण समिती शांतीवन येथे जाणीव सामाजिक सेवा संस्था पनवेल, रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराईज आणि संत रोहिदास विकास मंडळ नवीन पनवेलच्या सदस्यांनी तसेच शांतीवनच्या पदाधिकाऱ्यांनी व कुटुंबीयांनी एकत्रित श्रमदान केले. 
       गेल्या दोन वर्षात सामाजिक संस्थांनी शांतीवन परिसरात लावलेल्या झाडांपैकी सुमारे १०० पेक्षा जास्त झाडांना सकाळी या सदस्यांनी पाणी घालून श्रमदानाची सुरूवात केली. 
        आंब्याचे बाठे तसेच इतर झाडांच्या बिया वापरून शांतीवन येथील नर्सरीत रोपे तयार करण्यासाठी  माती आणि खत घालून पिशव्या तयार करण्यात आल्या. 
त्यानंतर स्नेहलता निसर्गोपचार केंद्राच्या नवीन इमारतीच्या मागच्या बाजूस  २० झाडे लावण्यात आली. 
यावेळी शांतीवनचे कार्याध्यक्ष ॲड प्रमोद ठाकूर, कोषाध्यक्षा सौ रेखाताई देखणे, प्रमुख कार्यवाह अजय शिर्के , स्नेहलता निसर्गोपचार केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ कटारा तसेच रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराईज, जाणीव सामाजिक सेवा संस्था पनवेल आणि संत रोहिदास विकास मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
----- वार्तांकन व  क्षणचित्रे संकलन --------
------ श्री. विजय गोरेगावकर ----



1 टिप्पणी: