विद्यालयाचे स्नेहसंमेलन एक आनंद जत्राच असते. शिपायापासून मुख्याध्यापकापर्यंत प्रत्येकाची धावपळ दिसून येते . विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या कलात्मक अंगाचे सादरीकरण यातून होत असताना त्यांच्या कसोट्या लागतात .विद्यार्थी व वर्गशिक्षकांमध्ये अहमहमिका याच काळात दिसून येते . अगदी गाणं निवडण्यापासून ते थेट स्टेजवर सादर होईपर्यंत वर्गशिक्षकाला व विद्यार्थ्याला अनामिक भीती असते. यंदाचे स्नेहसंमेलन अतिशय सुंदर झाले .
तिन्ही दिवसाच्या सांस्क्रतिक कार्यक्रमात अनेक विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर कलागुण दाखवलेत. दमलेल्या बापाची कहाणी या सादरीकरणात उपस्थित प्रेक्षकांना भावनिक बनता आले . कला प्रदर्शन , विद्न्यान प्रदर्शनात विद्यार्थ्यांसह शिक्षकांचे कौशल्य दिसून आले. हस्तलिखित व वेबसाईटचे प्रकाशन मोठ्या व्यक्तींच्या हस्ते झाले . यात संस्थेचे अध्यक्ष श्री.वसंतशेठ ओसवाल साहेब , शिक्षण उप संचालक व्ही.एस.म्हात्रे साहेब ,माजी शिक्षण सह संचालक श्री.पोटे साहेब होते. फनी गेम्स मध्ये सर्वच विद्यार्थी व शिक्षकांनी आनंद घेतला , या गेम्समध्ये किल्ली फिरवण्याच्या गेमने सर्वाधिक तिकिटे विक्री केली . स्नेहसंमेलन २९ ते ३१ जानेवारी २०१४ दरम्यान संपन्न झाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा